
Raghavan
Jagdish Deore
Pickup currently not available
"राघवण" हि प्रदूषणावरची कादंबरी आहे. राघवणच बालपण खेडेगावात गेलं. तिथला निसर्ग त्याला भुरळ घालतो. वयाच्या ६५ व्या वर्षीही त्याला त्याच बालपण साद घालत. खळाळून वाहणाऱ्या नद्या, नाले, हिरवीगार वनश्री, पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरी त्याला आठवतात. कादंबरीची सुरवात १९७० साली होते. इसवीसन २०२७ ला राघवण ६५ वर्षांचा होतो. तो आता गडगंज श्रीमंत आहे. त्याच स्वतःच विमान, हेलिकॉप्टर्स आहेत. तो शिवाचा निस्सीम भक्त आहे. त्याला पृथ्वीला परत तरुण करण्याचा ध्यास लागलाय. पृथ्वीवरच्या प्रदूषणाला मानवच कारणीभूत असल्याचं त्याच ठाम मत आहे. पृथ्वीच्या विद्रुपीकरणाला जगातली भयानक वाढलेली लोकसंख्या आहे असं त्याला वाटतंय. आपल्या दोन मित्रांना सोबतीला घेऊन जगातली लोकसंख्या करोडोवरून एक लाखावर आणण्याचा तो ध्यास घेतो. या साठी तो आकाशातल्या ओझोन थराता नष्ट करायचं ठरवतो. त्या साठी हॉट एअर बलून व त्यात फ्रेऑन वायू चे सिलेंडर्स आकाशात पाठवणार असतो. त्या साठी तो एक एनजिओ स्थापन करतो. जगात ठीक ठिकाणी भाषण देतो, हवेतल कार्बन डायऑक्साइडच वाढलेले प्रमाण, वितळणारे हिमनग, समुद्राची वाढती पातळी, वाढणार तापमान यावर जोर देतो. जगातून एक लाख सभासद गोळा करतो. सर्व गडगंज श्रीमंत. पुढे होऊ घातलेल्या उत्पादाचा त्रास त्याला व सभासदांना होऊ नये म्हणून नाशिक जवळचा अंजनेरी पर्वत मधून पोखरून जमिनीखाली भलं मोठं सर्व सुविधांनी युक्त शहरच बसवतो. मनूने प्रलयाच्या वेळी जसे सर्व प्रकारचे प्राणी, वनस्पती, बीबियाणे त्याच्या होडीत भरून घेतले होते तसे तो या जमिनीखालच्या शहरात गोळा करून ठेवतो. हे सर्व करताना यास शिवाचा आशीर्वाद आहे किंवा हे सर्व करण्याची शिवाने मला आज्ञा दिली आहे असं तो सर्वांना सांगतो. बरेचशे कायदे मोडतो, डावलतो. जसे फ्रेऑन ज्याला CFC गॅस पण म्हणतात, आंतरराष्ट्रीय बाजारात यावर बंदी आहे, हा गॅस जगातल्या काळ्या बाजारातून प्रचंड प्रमाणात गोळा करतो. अंजनेरी पर्वत पोखरून काढतो. या उद्योगात काही खून तो घडून आणतो.
राघवण मधला "घ" निघुन जाऊन रावण केव्हा झाला हे राघवण च्या हि लक्ष्यात येत नाही.
साहजिकच भारताची रॉ हि गुप्तचरसंघटना त्याच्या मागे लागते.
Details
Shipping & Returns
We strive to process and ship all orders in a timely manner, working diligently to ensure that your items are on their way to you as soon as possible.
We are committed to ensuring a positive shopping experience for all our customers. If for any reason you wish to return an item, we invite you to reach out to our team for assistance, and we will evaluate every return request with care and consideration.